Thursday, December 07, 2006

पीटर ग्राइम्स् ची झलक

कोण्या एका ब्लॉगवर हा कवितेचा तुकडा वाचला. तुकडा, कारण एका दीर्घकवितेचा हा एक छोटा भाग आहे. डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं, मग शब्दांचा थोडासा खेळ केला!

तर पीटर ग्राइम्स् ची ही झलक, with a twist!

Thus by himself compelled to live each day,
To wait for certain hours the tide's delay;
At the same times the same dull views to see,
The bounding marshbank and the blighted tree;
The water only, when the tides were high,
When low, the mud half-covered and half-dry;
The sunburnt tar that blisters on the planks,
And bankside stakes in their uneven ranks;
Heaps of entangled weeds that slowly float,
As the tide rolls by th' impeded boat.

- George Crabbe. Peter Grimes from The Borough.

जणू जगतो बघण्या रोज रोजचा खेळ
मोजतो प्रहर लाटांचा घालित मेळ!
दररोज दिसे ते पाणी, तोच किनारा
तरु पोखरलेले, तनुवर तोच शहारा.
अन् भरती येता तुडुंब भरता खाडी
ओहटी लागता, चिखल सुका राखाडी.
गुंतुनि तरंगे, गवतहि घेइ विसावा
हलकेच ढकलती लाटा निजल्या नावा!

"येईन उद्याही बघण्या हाच पसारा
की डुंबुनि कायम इथेच घेउ निवारा?"

7 comments:

hemant_surat said...

फ़ार कमी वेळेस असं होतं की original पेक्षा रूपांतर जास्तं छान होतं. मराठीतले तुझे रूपांतर जास्तं जिवंत आणि बोलके आहे. तो सारा पसारा डोळ्यांसमोरून तरळत गेला ठेवून एक हलकासा मोरपिसारा.

Manjiri said...

सुरेख!

Sumedha said...

धन्यवाद!

हेमंत, तुमच्या कौतुकाबद्दल आभारी आहे, पण हे जरा अति होतेय :) original कविता masterpiece आहे!

Gayatri said...

वा! अगदी 'जमलंय' गं सुमेधा! आणि तुझ्या शेवटच्या दोन ओळी तर खासच आहेत.

KedarsThoughtsWork said...

सुरेख समिधा!

I will compare it with what has been said about Gregory Rabassa's
better than original translation:
http://en.wikipedia.org/wiki/Gregory_Rabassa

Nandan said...

अनुवाद सुरेख जमला आहे. अर्थ तर उत्तमपणे व्यक्त झाला आहेच, पण शब्दांचे वजन आणि निवडदेखील अगदी चोख आहे. In fact, समिधाच सख्या या च्या चालीवर अनुवदित कविता म्हणता येतेय. :)

प्रिया said...

surekh! shevaTchyaa don oLee tar kevaL.... :)