Friday, June 29, 2007

पावसात भिजावं

पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

नको, वारा खूप सुटलाय
उगीच सर्दी ताप होईल
एकदा नव्हता का झाला, तसा!

पण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

कोणी बघितलं तर हसेल
हे काय लहान मुलांसारखं वागायचं
नाचावंसं वाटलं म्हणून नाचत सुटायचं?

पण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

खिडकीत बसून मस्त मजा बघावी
आडोशाला कसे मस्त तुषार येतात झेलता
त्याची गंमत थोडीच मुसळधार पावसात?

पण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

जोर कमीच झालाय बहुतेक आता
पुन्हा येईलच की अशी मोकळी सर
तेव्हा मात्र नक्की घेइन भिजून!

पण खरंच पावसात भिजावंसं वाटतंय का?

4 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

waatatay ...................aaNi watatay kaa? madhalaa haa pravaas
hmmm what say yaar....

paN manaapasun aavadal he je kahi lihilayas te

Nandan said...

आजच वाचली ही कविता. छान आहे, आवडली. मर्ढेकरांची ’कितीक दिवस नाही चांदण्यात गेलो’ आठवली.

प्रशांत said...

सुरेख कविता.

"पण खरंच पावसात भिजावंसं वाटतंय का?"
साध्या शब्दांत बरंच काही सांगून जाते ही ओळ.

Anonymous said...

humm chhana kityek divasani ki mahinyani blog vara aleya.

meenakshi