नीरव राती
चाहूल कोणाची गे?
चांद लबाड...
दुधी चांदणे
सांडते पसरते!
पाण्यावरती...
नाजुक लाटा
छेडत जाई कोण?
चुकार वारा...
वार्यावरती
गंध तरंगे मंद!
बकुळ फु्ले...
फुलांपल्याड
तो कोठे हरवला?
चांद लबाड!
सईला धन्यवाद!
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
chaanach aahe!
छान आहे.
हायकूच्या सईने सांगितलेल्या स्वरूपाशी अत्यंत कौशल्यपूर्णपणे जुळली आहेत सर्व कडवी.
मस्तच!
आणि मुख्य म्हणजे प्रत्येक कडवं आधीच्या कडव्याशी तर गुंफ़लं आहेच, पण शेवटच्या कडव्याशी पहिलं कडवंही गुंफ़लं आहेस, त्यामुळे मोत्यांचा नुसता सर न राहता त्याची माळ तयार झाली आहे जणू.
सुमेधा, मस्तच जमलाय हायकू.
प्रशांत नी मला खो दिलाय. त्यानीच सांगितल्या प्रमाणे तुला पाठवतेय.
रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)
कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी
(इति प्रशांत)
हायकूच्या या साखळीतली माझी कडी:
जुनं पुस्तक उघडतांच
पडला एक वाळका गुलाब
आता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब
माझा खो मेघनाला अन् सुषमाला
Post a Comment