Wednesday, November 18, 2009

बिती ना बितायी रैना

पुन्हा एकदा कवी गुलजार यांची क्षमा मागून :)

रात सरता सरेना, रात विरहे सजली
भिजलेल्या पापणी, रात कधीची विझली!

क्षण गेले हरवून, पुन्हा येतील कवेत?
विसरली ओळखही, कोणी घालेल का साद?
चांदण्याचे लेणे लेई, रात साजरी निजली
नीज हरवल्या नेत्री, रात कधीची विझली!


किती ऋतू ग सरले, गेली कितीतरी युगे
अन् रेंगाळले क्षण स्फुट आठवाचे मागे
असत्याहून ठिक्कर, रात काळोखी भासली!
रुसलेल्या नजरेत, रात कधीची विझली!

3 comments:

प्रशांत said...

अनुवाद मस्त जमला आहेच. आणि एक स्वतंत्र कविता म्हणूनही उत्तम आहे. आज बऱ्याच दिवसांनी (की महिन्यांनी) हा ब्लॉग वर आलेला पाहून खूप आनंद झाला.

HAREKRISHNAJI said...

वा. क्या बात है .

Mandar Gadre said...

आवडली!
"चांदण्याचे लेणे लेई, रात साजरी निजली".. सुरेख :)