खचित घडते भास्करदर्शन क्वचितच नभहि नितळ निळे
क्षितिजापासून क्षितिजापरति जलदालागुनि जलद पळे!
गडद जांभळे, काळे, करडे, ओथंबुन तम झाकळता,
हट्टी, लहरी, थांबुन, परतुन, धरणीवरि झोकुनी देता!
फसवून, हसवुन, हूल देउनि, कधी पसरुनि, झिरझिरुनी,
देता रविला कोंदण हसण्या, किरणांची ओंजळ भरुनी!
कधी धवल अन् हसरे - फुगरे, लेउन झालर चंदेरी,
नितळ निळ्या त्या अथांगतेवर चित्र रेखता जरतारी!
सांज-सकाळी कधी गुलाबी, कधी केशरी रंगभरे,
सर्वांगी कधि, कधी किनारी, विस्फारुनि हलके-गहिरे!
होउनि प्रतिभा तुम्ही बरसता, तुम्हारुपें काव्यानुभुती,
प्रीयकराचे दूत तुम्ही, तुम्हीच कविचे सांगाती!
भान हरपुनि तुम्हांस बघता, क्षितीजापरति नजर झुके
हे जलदांनो, तुम्हावाचुनि अपार नभही दिसे फिके!