Thursday, November 05, 2015

विणकर दादा

विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम!
काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम?
कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा
हलक्या स्पर्शे जुळवुनी घेशी, विणत राहशी अखंड तागा!
फिरुनि बघावे गाठ कुठे का, शोधुनिही मज सापडते ना!
चूक नसे पोतात जराशी, खोट नक्षीची कुठे दिसेना!
पदर असूदे जरतारीचा, असेल अथवा शाल सुताची,
असेल नाजुक, असेल भक्कम, कारागिरि पण त्याच तोडिची!
कधी एकदा मी हौसेने एकच नाते होते विणले,
विणता विणता चुकले होते, चुकता चुकता विणत राहिले!
सगळ्या उणिवा, सा-या खोचा अजुनी सहजच मजला दिसती
विणकर दादा, मला शिकव ना मखमाली वस्राची युक्ती!

मूळ कविता :

मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,
जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,
फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -
आगे बुनने लगते हो!
तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...
मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,
लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!
मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...
-गुलजार

3 comments:

nivant said...

Sumedha,

Achanak aaj blog pahila -- hi kavita parat vachali (FB var vachun share keli hoti ase smarate.)

Tuze blog lihine baryach kalasathi band zale ahe ase disate..

said...

वाह! फारच सुंदर !

Mandar Gadre said...

खूप दिवसांनी आलो इथे. काय सुंदर केलंय मराठीत रूपांतर तुम्ही. कोणी सुटं वाचलं तर हे मूळ मराठीच वाटेल असं.

शेवटच्या ओळींनी टचकन् पाणी काढलं!