Friday, November 17, 2006

त्रिवेणीची वेणी

क्षणभर मी ओळखलंच नाही, खूप वर्षांनी ती भेटली
तरी एक नुसतं स्मित फाकलं आणि ओळख पटली
...
चेहरे हरवले तरी डोळ्यातलं हासू कसं जपून राहतं?


शाई विटून गेली तरी वाचता येतातच की जुनी पानं
शब्द फुटत नसले तरी कानात घुमतं ना जुनं गाणं!
...
वह्या न् तबकड्यांचं ओझं उगीच वाहत राहतो आपण!


उन्हाचे कवडसे जुन्या घराच्या खिडकीत घेउन जातात
पावसाचे थेंब परसातल्या झाडाखाली नेउन सोडतात
...
आठवणींना सुद्धा लागतातच का निमित्तांचे हिंदोळे?

11 comments:

Mints! said...

shevatache kadave mastach ...

Tulip said...

cool!!
Sumedha.. mast ch jamlyat Triveni. keep posting more.

Anand Sarolkar said...

"Vahya n tabakdyanch ojha"...nice thought!

Nandan said...

Chhaan.
शाई विटून गेली तरी वाचता येतातच की जुनी पानं-
hee oL visheSh aavaDali. यावरुन 'किताबोंपे धूल जमनेसे कहानी कहाँ बदलती है' ही ओळ आठवली.

Gayatri said...

उत्तम! खूप आवडले तीनही पेड. दुसरा खास!
आणि comments साठीचं आंतर-अग्नी नाव किती समर्पक ठेवलंयस :)

Sumedha said...

सर्वांना धन्यवाद.

गायत्री, तू "आंतर-अग्नी" बरोबर टिपलंस आणि वाखाणलंस, बघून खूप छान वाटलं :-)

रोहिणी said...

Khupach sundar...... keep posing

Shilpa Datar said...

nice

वैभव जोशी said...

mast. aavaDalyaa

Akira said...

Khoop awadlya Trivenya! :)

Asha Joglekar said...

Sunder!