Thursday, January 25, 2007

कितीतरी गोष्टी

कितीतरी गोष्टी
करायच्या राहून गेल्या
सांगायच्या राहून गेल्या
विचारायच्या राहून गेल्या

वेळोवेळी ठरवल्या होत्या करायच्या

कधीकाळी नोंद करून ठेवायचे
विसरू नये म्हणून

आता तर त्या नोंदीच हरवून गेल्यात कुठेतरी!

आणि नोंदींशिवाय केलेल्या गोष्टीच तरळत राहिल्यात!
सपकन् पडून जाणार्‍या पावसाच्या सरीसारख्या...

5 comments:

Mints! said...

hmmmmmmmmmmm!

Milind said...

जेव्हा खूप busy असतो तेव्हा मी तर अशा कितीतरी गोष्टींच्या यादीला लांबत जाणारी मारुतीची शेपटी म्हणतो. आणि त्या आपलाच एक भाग असल्याने कापता सुद्धा येत नाहीत!

Anonymous said...

वाह! इसे कहते हैं मूँह की बात छीनना! मस्त आहे कविता!

Anonymous said...

khup chan ahe keep it up

Anonymous said...

mastacha

meenakshi