Tuesday, April 10, 2007

दिल ढूंढता है...

कवी गुलज़ार यांची क्षमा मागून :-)


अधिर मनाला ओढ लागते मुग्ध मोकळ्या एकांताची
बसुनि केधवा स्वप्नं रेखली तुझ्या गोजिर्‍या सहवासाची...

थंड कोवळ्या सोनसकाळी ऊन हासरे घ्यावे लेऊन
विहरत जावे तुझ्या स्मृतीसव या स्वप्नातुन त्या स्वप्नातुन
ओढून घ्यावी पापण्यावरी झालर तुझिया स्नेहाची...

आणिक निवत्या सायंकाळी फुंकर घाली सांज समीरण
भान हरुनि लुटून घ्यावी आकाशी तार्‍यांची पखरण
उगीच द्यावी घ्यावी स्वत:शी शपथ उगवत्या चंद्राची...

कुठे दूरच्या निळ्या डोंगरी कवळुन घ्यावे जलद धुक्याचे
मुक्‍त मनाने पिऊन घ्यावे घुमणारे स्वर निवांततेचे
ओथंबुनि नयनात रहावी चाहुल भिजल्या निमिषांची...

9 comments:

Tulip said...

kay heva vatava ashi shabdrachana keli ahes Sumedha. original kavitechi khumari ajunch vadhali. sunder!

Sneha Kulkarni said...

original rachanela shobhesa zala aahe anuvaad! Chhanch!

Nandan said...

tulipshi sahamat. khaskaroon garmiyon ki raat jo purawaiyyan chale che 'nivatyaa sanyakaLee funkar ghaali sanj sameeraN' -- great!

प्रिया said...

kyaa baat hai! :)

Sumedha said...

थांकू थांकू!

मूळ काव्य इतकं काही डोळ्यापुढे उभं करतं, त्यातलं तरी खूप नाहीच आलं असं वाटतंय. शिवाय गेयता सुद्धा नाही गाण्याइतकी!

Manjiri said...

surekh!

Anand Sarolkar said...

Atishay sundar :) Reminded me of Gayatri's Hindi translation of a Marathi song.

Gayatri said...

आहा! :) खूप दिवसांनी लिहिलंयस..आणि नेहमीसारखंच सुंदर.

a Sane man said...

surekh....khup sahaj ni layabaddha zalya rachana...farach chhan