तपत्या प्रखर उन्हाने धरती विराण आहे
घन दूर एकटा तो, तरिही अजाण आहे
हलक्या विरल धुक्याची ओढून शाल, वेडी
कळी वाट पाहताहे, रवी बेइमान आहे
चढत्या गडद तमाने, भवती भयाण होता
चमके, लपे चुकार, जुगनू गुमान आहे
थकल्या रखड गतीने चलता न वाट संपे
दिसती पल्याड लहरी, का भासमान आहे
पगल्या चपळ मनाला कशी आवरू कळेना
हरले तरी हरेना, आशाच प्राण आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
आपली गझल छान आहे. मतला, 'रवी', मक्ता आवडले. तिसऱ्या व चौथ्या शेरांच्या दुसऱ्या ओळी अजून चांगल्या होऊ शकतील असं वाटतं.
व्वा !
Post a Comment