Monday, October 16, 2006

उसनेपणा

मान उंच करून, डोळे जरा उघडून, आजूबाजूला बघितलं

तिचं दु:ख पाहून थोडीशी कळवळले
तिचे अश्रू पुसायला खोटं अवसान कुठून आलं माझ्याकडे?

त्याच्या वेदना पाहून जराशी उसासले
त्याला क्षणभर हसवायला उसनी विनोद बु्द्धी कुठून आली माझ्याकडे?

त्यांची अगतिकता पाहून किंचित धपापले
त्यांना समजाऊन थोपवायला ठेवणीतला शहाणपणा तरी कुठून आला माझ्याकडे?

मग डोळे मिटून माझी मी जेव्हा असते...

माझेच अश्रू का अनावर होतात?
माझीच निराशा का उतू जात राहते?
माझाच वेडेपणा का वेडावत राहतो?

1 comment:

Anonymous said...

सुमेधा,

हे असंच असतं
जो इतरांना समजून घेतो
त्याला कोणीच समजून घेत नाही
जो इतरांसाठी रडतो
त्याच्यासाठी कोणालाच रडायला वेळ नसतो
त्याच्या मदतीला फ़क्तं
त्याचेच अश्रू, वेदना
मुक्याने बघणार्या भिंती
देतात त्याला संवेदना